You are currently viewing शेख शमशूद्दीन युनूस यांचे उदय सामंत यांना पत्र

शेख शमशूद्दीन युनूस यांचे उदय सामंत यांना पत्र

शेख शमशूद्दीन युनूस रा. वालावल यांनी मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत व शैक्षणिक वर्षे वाया गेल्या बाबतचे पत्र लिहिले आहे.

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालयात शेख शमशुद्धिन युनूस यांची मुलगी कु.शेख राहिनी शमशुद्धिन ही शिकत होती. तिने शैक्षणिक वर्ष 2018 – 19 या वर्षी बी.एस.सी. तृतीय वर्गाची सहावी सेमीस्टरची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल जून 2019 रोजी लागला त्या निकालात तिला अनुत्तीर्ण ठरविले गेले.

 

परंतु पुन्हा निकाल विरोधात दाद मागण्यासाठी फेर तपासणी करता अर्ज दाखल केला गेला होता. त्या बाबतीतला निकाल 5 सप्टेंबर 2019 रोजी प्रमाणपत्राने ती उत्तीर्ण असा जाहीर केला. परंतु या निकालच्या अनुत्तीर्ण ते उत्तीर्ण या प्रक्रियेत शमशुद्दीन हसन शेख यांच्या मुलीची मानसिक स्थिती बिघडली असल्याचा आणि तिचे शैक्षणिक वर्ष वाया असल्याला जबाबदार कोण? असे पत्र शेख शमशुद्धिन युनूस यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना लिहिले.

 

तसेच सन 2020 हे वर्ष देखील covid-19 या महामारीच्या विश्व संकटामुळे लॉकडाउन झाल्यामुळे मुलीची दोन वर्षे वाया गेली. तिच्या पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या दृष्टीनेही तिचे नुकसान झाल्यामुळे अत्यंत संघर्ष करावा लागणार आहे, असे शमशुद्दीन शेख यांनी म्हटले आहे.

 

त्यामुळे शासनातर्फे योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी शिफारस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग, उदय सामंत यांच्याकडे शेख शमशुद्धिन युनूस यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seven =