You are currently viewing श्वान “ब्राव्हो”ची मदत.. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस यंत्रणा हायअलर्ट

श्वान “ब्राव्हो”ची मदत.. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस यंत्रणा हायअलर्ट

सिंधुदुर्ग :

नाताळ तसेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तसेच दारू वाहतूक होणार असल्याने, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सिंधुदुर्ग व गोवा सीमेवर पत्रादेवी येथे इन्सुली येथे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी आपले ही मोहीम यंदाही पुढे नेली जात आहे. यासाठी “श्वान ब्राह्मो” चा सुद्धा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

मालवण तसेच देवगड येथील अमली पदार्थ तपासणीसाठी या”श्वान ब्राह्मो” ने मोलाची कामगिरी केली होती. या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पोलिस पथकामध्ये पोलीस निरीक्षक सय्यद, रूपेश परब हे कार्यरत राहणार आहे. अवैद्य दारू वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असून गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =