You are currently viewing कुडाळ सांगिर्डे येथील इमारत; आयुक्तांकडून दिरंगाई

कुडाळ सांगिर्डे येथील इमारत; आयुक्तांकडून दिरंगाई

३० एप्रिल पर्यंत निर्णय न मिळाल्यास १ मेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण होणार; भास्कर परब

मुंबई कोकण गोवा नॅशनल हायवे क्रमांक ६६ घ्या भूसंपादन प्रक्रियेत कुडाळ सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ चा समावेश नसताना भूसंपादन प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी इमारत मालकाशी आणि मध्यस्त दलाल यांच्याशी संधान साधून ही इमारत भूसंपादन प्रक्रियेत दाखवून लाखो रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केलेला आहे, याबाबत आम्ही कुडाळ प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी,व कोकण आयुक्तांपर्यत पाठपुरावा करून निर्णय मिळण्यासाठी प्रयत्न केले, आयुक्त स्तरावरून स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली आणि चौकशी केली याला दोन वर्षे होत आली तरी कोकण आयुक्तांकडून निर्णयाला विलंब का ॽ मध्यंतरी याबाबत आयुक्तांकडे माहीती अधिकार नियमाखाली झालेल्या निर्णयाची माहिती मागितली असता अजून चौकशी पूर्ण झाली नाही,त्यामुळे माहीती पुरविता येत नाही,असे उत्तर देण्यात आले होते,पण या उत्तराला सुमारे सात ते आठ महिने झाले तरीही उत्तर नाही, त्यामुळे ज्या विश्वासाने आम्ही हे प्रकरण निष्पक्षपाती पणे चौकशी आयुक्तांकडूनच होऊन खरा न्याय मिळेल असा विचार करून हे प्रकरण कोकण आयुक्तांकडे सोपवले त्या विश्वासाला तडा जात आहे तसेच न्याय मिळणे शक्य वाटत नाही म्हणून कोकण आयुक्तांकडून ३० एप्रिल पर्यंत इमारत क्रमांक ४०५६ याबाबत निर्णय द्यावा, अन्यथा १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =