You are currently viewing डोहाच्या.. मोहात ..मी..!!

डोहाच्या.. मोहात ..मी..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डोहाच्या.. मोहात ..मी..!!*

 

मी कधी कधी

पवित्र माणूस आहे

उतरतो माझ्यातही व्यसनांचा डोह

अन् जगण्याला येतो मरणाचा मोह

 

मी कधी कधी

विश्वामित्र आहे

उतरतो माझ्यातही वासनेचा डोह

अन् होतो मला तपोभंगाचा मोह

 

मी कधी कधी

जमदग्नी आहे

उतरतो माझ्यातही क्रोधाचा डोह

अन् होतो मला शाप देण्याचा मोह

 

मी कधी कधी

कवी आहे

उतरतो माझ्यातही यमकांचा डोह

अन् होतो मला छळण्याचा मोह

 

हल्ली डोह सारे

तसे कोरडे झालेत

कविताच माझ्या

मला छळत आहेत अन् मी कवितेला

 

स्वतःवर व जगण्यावर प्रेम करा

कवितेला अगदीच जवळ करा..

व्यसन..वासना..क्रोध दूर करा

यमकाला जवळ..तर यमाला दूर करा

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा