सैनिक स्कूल आंबोली येथे साहसी व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे उद्घाटन
आंबोली :
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये ‘उन्हाळी साहसी व व्यक्तिमत्व विकास’ या पहिल्या शिबीराचे उत्साहाने उद्घाटन झाले . या साहसी शिवीरास महाराष्ट्र भरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट एक्स सर्व्हिसमेन असोशिएशन संचलित द कर्नल्स ॲकॅडमी फॉर ॲडव्हेन्चर ॲण्ड ॲरो स्पोर्टस् आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या सयुंक्त विद्यमाने विद्यार्थ्यासाठी उन्हाळी साहस आणि नेतृत्व विकास निवासी साप्ताहीक शिवीर सैनिक स्कूल आंबोली येथे १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ व २५ एप्रिल २०२६ ते ०१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. आंबोलीतील जैव विविधतेचा अभ्यास, सहयाद्रीच्या कडेकपारीत साहसाची अनुभूती, आंबोलीतील रानमेवा चाखणे, वन भोजन, मोबाईल आणि सोशल मिडीयापासून दूर राहून स्वच्छंद भटकंतीचा अविस्मरणीय अनुभव या शिवीरात घेता येईल.
१० वर्षावरील मुलामुलींकरीता सदर शिबीरामध्ये प्रवेश देण्यात येतो. या साहस शिबीरामध्ये रॉक क्लायबिंग व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, माऊंटनियरींग, जंगल सफारी, ट्रेकिंग, रायफल शुटींग, बर्ड अॅण्ड प्लाट ऑब्झर्वेशन, कराटे, मार्शल आर्ट, ऑबस्टॅकल ट्रेनिंग, नेतृत्वगुण विकास मार्गदर्शन, ग्रुप डिस्कशन, डिबेट, शारिरीक कवायत, योगा प्राणायाम, सांस्कृतिक शेकोटी कार्यक्रम यांचा समावेश आहे. आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात, सैनिक स्कूलच्या भव्य प्रांगणात आयोजित या साहस शिवीरामध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी सिंधुदुर्गातील युवक युवतींना उपलब्ध झाली आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनिल राऊळ, सचिव श्री. जॉय डॉन्ट कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, मुख्याध्यापक श्री. नितीन दशरथ गावडे यांनी केले आहे.
