You are currently viewing भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजेनेकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजेनेकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या मिाविद्यालयातील इ.11वी  व 12 वी तसेच इ 11वी व 12वी नंतरच्या व्यावसायिक , बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज ऑफलाईन  (मॅन्युअली) पध्दतीने या कार्यालयाकडून दि. 31 डिसेंबर 2021 अखेर अर्ज वाटप  व स्विकृती करण्यात येत आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे दुरध्वनी क्र. 02362 228882  वर संपर्क साधावा.

            तरी सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणाच्या महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =