You are currently viewing सतीश पाटणकर, प्रा. संजय कात्रे यांना कोमसाप शाखा सावंतवाडीचे पुरस्कार जाहीर.!

सतीश पाटणकर, प्रा. संजय कात्रे यांना कोमसाप शाखा सावंतवाडीचे पुरस्कार जाहीर.!

सावंतवाडी :

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व. प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडीकडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना नुकत्याच झालेल्या कोमसाप कार्यकारिणीच्या सभेत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत‌.

स्व. प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार निवेदक, माणगाव हायस्कूलचे आदर्श सेवानिवृत्त शिक्षक प्रा. संजय कात्रे यांना तर कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांना जाहीर करण्यात आले आहेत.

यावेळी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीस अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. उषा परब, जिल्हा कार्यकारिणी कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य विनायक गांवस, कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, ॲड. नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

दि. १५ मार्च रोजी सकाळी १० वा. राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे‌त.

दरम्यान, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कोमसापने आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे व कोमसाप सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा