You are currently viewing महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना संचारबंदी कालावधीसाठी मिळणार 1500 रुपये अर्थसहाय्य…!

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना संचारबंदी कालावधीसाठी मिळणार 1500 रुपये अर्थसहाय्य…!

*शासनाकडून याआधी घोषित केलेली रु 5000 अर्थसहाय्य रक्कम कामगारांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू…*

*या आधीच्या अर्थसहाय्य योजनेचा पूर्ण लाभ अद्यापपर्यंत न मिळालेल्या कामगारांनी हताश न होता संचारबंदी कलावधीनंतर संघटनेशी संपर्क साधावा…प्रसाद गावडे यांचे आवाहन*

पणदुर :

शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळांतर्गत नोंदीत कामगारांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव संचारबंदी कालावधीसाठी अर्थसाह्य म्हणून शासनाकडून पंधराशे रुपये अर्थसाहाय्य देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे मंडळाकडील जवळपास 12 लाख नोंदीत कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. याआधी देखील कोविड-१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता माहे एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली होती.तद्नंतर 3000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे तत्कालीन कामगार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील  यांनी घोषित केलेले होते.मात्र बहुतांश बांधकाम कामगारांच्या प्रत्यक्ष खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही अशी परिस्थिती आहे.संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर याबाबत पाठपुरावा चालू असून कामगारांनी अद्यापही लाभ मिळाला नसल्याने हताश होऊ नये. तसेच नव्याने अर्थसहाय्य जाहीर झाले म्हणून घाई गडबड न करता संचारबंदी कालावधीनंतर लाभ न मिळाल्यास संघटनेशी संपर्क (☎️8275390875) साधावा असे आवाहन  स्वाभिमानी कामगार संघ,सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =