You are currently viewing व्यापाऱ्यांच्या तक्रारीची नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली तात्काळ दखल

व्यापाऱ्यांच्या तक्रारीची नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली तात्काळ दखल

पटवर्धन चौकातील ट्रान्सफॉर्मरकडील स्पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी काम सुरू!

कणकवली

कणकवली पटवर्धन चौकात गेले काही दिवस होत असलेल्या स्पार्किंग मुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्या बाबत तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर या घटनेची तात्काळ नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दखल घेतली. व आज बुधवारी सायंकाळी पटवर्धन चौकात ज्या ठिकाणी विद्युत ट्रांसफार्मर जवळ स्पार्किंग होऊन मोठ – मोठे आवाज येत होते या ठिकाणी तुटलेली केबल जॉईंट करण्याचे काम हाती घेण्यात आले. कणकवली शहराचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे हे स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून होते. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या धोकादायक स्थितीबाबत तात्काळ लक्ष घातल्याबद्दल कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील व्यापाऱ्यांसह जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. कणकवली पटवर्धन चौकात गेले काही दिवस ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणीच स्पार्किंग होत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. याबाबत गवाणकर हार्डवेअर चे मालक गौरव गवाणकर व एस एस बोरवेलच्या सुप्रिया पाटील यांनी लक्ष वेधले होते. याबाबत वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार देखील घडत होते. या संदर्भात नगराध्यक्ष श्री नलावडे यांचे लक्ष वेधल्यानंतर विद्युत अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र त्या ठिकाणची एक हेव्ही होल्टेजची केबल बाजूला करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तर एक केबल खराब झाल्यामुळे स्पार्किंग होत मोठ्याने आवाज होत असल्याचे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकाराची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. व नगरपंचायत चा जेसीबी देऊन आज सायंकाळी हे काम तात्काळ मार्गी लावून घेतले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्वसामान्य जनतेतून त्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच नगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी होणारा संभाव्य अपघात देखील टाळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =