You are currently viewing पहाट

पहाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पहाट*

 

झाली झुंजूमुंजू पहाट,

लक्ष चांदण्या विझल्या नभात,

काजव्यांच्या दिपमाळा मिटल्या रानात,

मंद झाले नक्षत्रांचे दिवे गगनात.

 

ओघळला बहर प्राजक्ताचा अंगणात,

किलबिलाट भूकेसाठी सुरू घरट्यात,

दंवबिंदूंचे चमकले मोती पानाफुलात

ओली लाल माती पायवाटेत.

 

फूलांचे फूलोरे फूलले रानावनात,

सुगंधाचा घमघमाट सुटला आसमंतात,

वारा जागा झाला धावे शेताभातात,

डूलते हिरवे जावळ माळरानात.

 

हंबरती वासरे पहा गोठ्यात,

तूर्रेदार कोंबडा आरवे जोमात,

आता पळभरात फूटेल तांबडे नभात,

पूर्वा सजेल लाल गुलाबी रंगात.

 

रवीची किरणे येतील धावत,

सुवर्णरथ येईल सोने सांडत,

कलली पहाट झाली सुप्रभात,

नव्या दिनी नव्या आशा फुलवत.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा