सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत भव्य नाईट अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष..!
परुळे पंचक्रोशी मर्यादित “ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026” ही भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा मैदान परूळे गव्हाणवाडी येथे उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न. सावली फाउंडेशन, सिंधुदुर्ग पुरस्कृत या स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
🏆 बक्षिसे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले:
🥇 प्रथम पारितोषिक – ₹15,000 व आकर्षक चषक
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹10,000 व आकर्षक चषक
🥉 तृतीय पारितोषिक – ₹2,500
🏅 चतुर्थ पारितोषिक – ₹2,500
🌟 वैयक्तिक पुरस्कार:
🏏 मालिकावीर – ₹1,000 व चषक
🔥 उत्कृष्ट गोलंदाज – ₹500 व चषक
💥 उत्कृष्ट फलंदाज – ₹500 व चषक
🛡️ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – ₹500 व चषक
🎤 या शानदार स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला पंचायत समिती सभापती मा. सचिन देसाई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला सावली फाउंडेशनचे संस्थापक मा. सचिन पाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
💐 यावेळी जमीन मालक व मान्यवर सुरेश सावंत, विजय घोलेकर, जगदीश तेंडोलकर, सुभाष दाभोलकर, रोहित म्हापणकर, रोशन परुळेकर यांचा शाल, श्रीफळ व कल्पवृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला.
👏 आयोजकांची मेहनत कौतुकास्पद:
सोमेश सावंत, अण्णा सावंत, सुशांत सावंत, आदित्य सावंत, चंदन परुळेकर, रुपेश पाटकर, धीरज आंबडपालकर, गणेश लांबर, योगेश परुळेकर, गोविंद परुळेकर, भूषण पाटकर, मंदार लांबर, विठू लांबर, रुपेश लांबर यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले.
🎉 खेळाडूंच्या जोशपूर्ण कामगिरीमुळे व प्रेक्षकांच्या उत्साहामुळे ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली!
#Cricket #NightTournament #Sindhudurg #SawaliFoundation #SportsEvent #LocalTalent
