You are currently viewing राणेंसोबत आहोत हे दाखवण्यासाठीच रणजित देसाई यांचे आंदोलन
आपण राणेंसोबत आहोत आणि किती कार्यकर्ते शिल्लक राहीले हे दाखवण्यासाठीच रणजित देसाई यांचे आंदोलन- सुशिल चिंदरकर

राणेंसोबत आहोत हे दाखवण्यासाठीच रणजित देसाई यांचे आंदोलन

आपण राणेंसोबत आहोत आणि किती कार्यकर्ते शिल्लक राहीले हे दाखवण्यासाठीच रणजित देसाई यांचे आंदोलन- सुशिल चिंदरकर

माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कुडाळ नेरूरपार मालवण रस्त्यासाठी केलेले आंदोलन हा केवळ दिखावा होता. माजी जि.प.अध्यक्ष विकासभाई कुडाळकर शिवसेनेत आल्यामुळे आपण राणेंसोबत आहोत आणि किती कार्यकर्ते शिल्लक राहीले हे राणेंना दाखवून देण्यासाठीच देसाई यांचे हे आंदोलन होते. मात्र हा रस्ता मंजूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून तब्बल ३ कोटी २१ लाख रुपये निधी मंजूर घेतले. या कामाची एकदा निविदा प्रसिद्ध होऊन ती कोणत्याही ठेकेदाराकडून भरली न गेल्याने या कामाची पुन्हा ई निविदा काढण्यात आली आहे. त्यातच कोरोना संकट आल्यामुळे ही कामे थांबवून लोकांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याकडे सरकारने भर दिला. आपल्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात विकास कामांची टेंडर प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला रणजित देसाई यांनी मतदारसंघात येऊन (इतर वेळी घरी बसून) आंदोलने करून लोकांची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये. शहरातील कार्यकर्ते घेऊन जाऊन आंदोलन करावे लागते यातच देसाईंची अकार्यक्षमता दिसून येते. कुडाळ तालुक्यातील जनतेला सर्व काही ज्ञात आहे. अशी खरमरीत टीका युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी केली आहे.

सुशिल चिंदरकर पुढे म्हणाले, शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी कुडाळ नेरूरपार मालवण रस्त्याच्या निविदा प्रक्रियेबाबत दिलेले माहिती योग्यच आहे.मात्र घरात बसणाऱ्यांना कोरोना संकट काय हे कळणार ानाही. त्यामुळेच अतुल बंगे यांनी केलेली टीका दलबदलू रणजित देसाई व नव्या भाजप कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबलेली दिसत आहेत. बंगे यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देताना कुडाळ नेरूरपार मालवण रस्ता मंजूर झाला तसेच निविदा काढण्यात आली हे देसाई यांनी मान्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

तसेच कोणी निष्क्रिय बोलून निष्क्रिय होत नसतो. प्रत्येकाच्या कामाची पोचपावती जनता देत असते आणि आ.वैभव नाईक यांना जनतेने दोनदा निवडून देऊन कोण काम करणारा आहे आणि कोण नाही हे सिद्ध केले आहे. याउलट रणजित देसाई ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या मतदारसंघातील जनतेनेही आ.वैभव नाईक यांना मताधिक्य दिले. तसेच नेरूर जि.प.मतदार संघातील १ ग्रा.पं. सोडली तर इतर सर्वच्या सर्व ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. त्यामूळे देसाई यांनी दुसऱ्यांना निष्क्रिय समजण्यापेक्षा आपण किती लोकांची कामे केली, मतदार संघात कितीवेळा गेलो याचे मूल्यमापन करावे व आ.वैभव नाईक यांच्यावर टीका करताना आपले कर्तृत्व सिद्ध करावे नंतरच टीका करावी. असा सल्ला सुशिल चिंदरकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + four =