मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “कामाक्षी क्रिएटिव्ह” यांच्या संयुक्त विद्यमाने “नाट्य लेखन स्पर्धा २०२६” आयोजित करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीला समाजमन प्रतिबिंबित करण्याचे माध्यम मानून नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांना सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही स्पर्धा आखण्यात आली आहे.
स्पर्धा सर्व वयोगटांतील लेखकांसाठी खुली आहे. दोन अंकी नाटकांच्या स्वरूपात स्वतंत्र किंवा संयुक्त लेखन मान्य आहे. नाटकाचे विषय कोणतेही असू शकतात, मात्र साहित्यचौर्य (Plagiarism) आढळल्यास संहिता रद्द करण्यात येईल. संहितेचे टंकलेखन मराठी भाषेत, संगणकावर करणे अनिवार्य आहे; हस्तलिखित/छायाचित्र स्वरूपातील संहिता स्वीकारली जाणार नाही.
संहिता पाठवण्यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२६ असून, निकाल २७ जुलै २०२६ रोजी जाहीर केला जाईल. संहितेच्या मुद्रित दोन प्रती आयर्न फिल लाँड्री, रूम नंबर १२१, चाळ क्रमांक ११, म्युनिसिपल लेबर कॅम्प, एमएमजीएस मार्ग, नायगाव, दादर, मुंबई – ४०००१४ या पत्त्यावर टपालाद्वारे तसेच PDF आणि Word स्वरूपात ई-मेल: marathisahityavkalaseva@gmail.com या पत्त्यावर पाठवता येईल.
प्रवेश शुल्क ₹५००/- असून, शुल्क जमा केल्यावर स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपद्वारे गुरुदत्त दिनकर वाकदेकर (मो. ९९८७७४६७७६) यांना पाठवावा. सर्व सहभागी लेखकांना सहभाग प्रमाणपत्र बक्षीस वितरण कार्यक्रमात दिले जाईल. प्रथम पारितोषिक ₹१०,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, द्वितीय ₹५,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, तृतीय ₹३,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यांच्यासह प्रदान केली जातील.
निवडक नाटकांची अंतिम फेरी व सार्वजनिक सादरीकरण आयोजकांकडून कळवले जाईल. नाटकांचे मूल्यमापन ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यलेखक व साहित्यिक यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाद्वारे आशय, संवाद, नाट्यमयता, व्यक्तिरेखा आणि सामाजिक संदेश यांच्या निकषांवर केले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : गुरुदत्त दिनकर वाकदेकर – ९९८७७४६७७६, राकेश तळगावकर – ८५९१८२५७७५.
