You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी वर्षा’ची १० एप्रिलला कणकवलीत भव्य सुरुवात

खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी वर्षा’ची १० एप्रिलला कणकवलीत भव्य सुरुवात

खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी वर्षा’ची १० एप्रिलला कणकवलीत भव्य सुरुवात

वाढदिवसानिमित्त सोनू निगम यांचा लाईव्ह कार्यक्रम; पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन

कणकवली

माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे हे १० एप्रिल २०२६ रोजी ७४ व्या वर्षात पदार्पण करत असून, त्यांच्या ७५ व्या वाढदिवसापर्यंतचा कालावधी ‘अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हावासीयांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हे वर्ष संस्मरणीय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या ‘अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती’तर्फे वर्षभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, या उपक्रमांची भव्य सुरुवात १० एप्रिल रोजी कणकवली येथे होणार आहे.
त्या दिवशी सायंकाळी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय, कणकवली समोरील भव्य पटांगणावर राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मुख्य सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुश्राव्य गायनाचा ‘लाईव्ह’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, राणे यांना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून जमा होणारी पुस्तके जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांना देण्यात येणार असून, त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे.
कोकणाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे समितीने नमूद केले आहे. १० एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या भव्य सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती’तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा