*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सभोवताली गर्दी…*
सभोवताली गर्दी
जेव्हा वाढत जाते
भिती वाटते
मनात…!
का वाटावेत
इतके परके जन?
आपल्याला अन
उपरेपण?…
माहित होते
उरी धडधड होणार
जेव्हा खुणावणार
घरपण…!
आता खुणावतो
फक्त स्मृतीत राहणारा
आपलासा कोपरा
कायम…!
सभोवताली गर्दी
आता वाढून विस्तारली
मात्र चालली
दूर…!
विसावताना सांजवेळी
डोळ्यांत आठवणींचा पूर
भास धूसर
सारेच…!
शब्द शब्द
सभोवतालच्या गर्दीत चालले
व्यापून राहिले
आयुष्य…!
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
‘अंतरीच्या खोल डोही’ तून…
