*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अयोध्यानरेश श्रीरामचंद्र*
चैत्र मास नवमीदिनी सुर्य उगवला
तेजोगोलकची जणू हा चमचमला
विष्णू बालरुपात पहा राम सावळा
अयोध्यानरेश श्रीरामचंद्र जन्मला
वीर रघुवंश तेज वारसा हा दिला
कौसल्या दशरथास बाळ लाभला
तरसले जे नयन रुप पाहण्पा मुला
अयोध्यानरेश श्रीरामचंद्र जन्माला
मातृपितृवचन बंधुप्रीय सखा खरे
राजकुमार राम हा धीरोदात्त वावरे
दिव्यस्वरूप अभिराम राम हे जाहे
प्रजावस्तलता त्याच्या मनी पाझरे
दुष्ट दुर्जनासी कली काळ तो ठरे
एकपत्नी एकबाणी वचन एक रे
गुरुवंदन कर्तव्ये प्राणप्रिय हो बरे
रामराज्य कसे असावे तो पाठ खरे
उद्धरण्यास कैक जीव सहे
स्थितप्रज्ञ यातना दु:ख भोगण्या
हनुमान स्वामी सीताकांत शोभला
आदर्शाचा हाच वस्तूपाठ पाहण्या
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक
