You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका! रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन निव्वळ पाच कामांची भुमिपुजने!

हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका! रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन निव्वळ पाच कामांची भुमिपुजने!

हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका!
रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन निव्वळ पाच कामांची भुमिपुजने!

कुडाळ (प्रतिनिधी)

हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भुमीपुजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आली
हुमरमळा वालावल गावातील विकासकामांचा ओघ कायमच सुरू असतो यातच मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणुन पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, सौ संजना गुंजकर, सौ हेमांगी कद्रेकर, श्री मितेश वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांची भुमीपुजने करण्यात आली यामध्ये हुमरमळा परकरवाडी पायवाट, हुमरमळा परकरवाडी गणेश घाट, श्री रामेश्वर मंदीरांकडुन रस्ता गटार बांधकाम, हुमरमळा पडोसवाडी गणेश घाट सुशोभिकरण या कामांचा समावेश असुन ग्रामअधिकारी श्रीम अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा सुयोग्य प्रशासनचा पारदर्शक कारभार चालू असताना विकासाची घौडदौड सुरू आहे
आज झालेल्या भुमीपुजन कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, प्रभाकर गुंजकर, हेमंत कद्रेकर, नरो पेडणेकर, शानो परकर, दीनेश परकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भिवा गुंजकर, ओमकार गुंजकर, सुजाता गुंजकर, गुरु परब, सागर परकर, पोलीस पाटील श्री उमेश शृंगारे, हेमंत केसरकर, जितु सावंत, पंकज माड्ये, पपु दळवी, विजय कानडे, दादा परकर, लक्ष्मण खरात, श्रीम सुलभा गुंजकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा