You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषदेचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रा.आनंद वैद्य व प्रा.सुभाष गोवेकर यांना प्रदान
Oplus_16908288

कोकण मराठी साहित्य परिषदेचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रा.आनंद वैद्य व प्रा.सुभाष गोवेकर यांना प्रदान

रत्नागिरी (प्रतिनिधी):

कोकण मराठी साहित्य परिषदचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ग्रंथमीत्र पुरस्कार प्राप्त कोकण मराठी साहित्य परिषदेचे जेष्ठ सदस्य.प्रा.आनंद वैद्य व सावंतवाडी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर यांना प्रदान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रत्नागिरी, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रधान करण्यात आला.

कोकण मराठी साहित्य परिषदचा वर्धापन दिन सोहळा २४ मार्च रोजी रत्नागिरी मालगुंड येथे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा सौ नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप ढवळ आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातून आदर्श साहित्यिक कार्यकर्ता निवडण्यात येतो.

यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने दोन ज्येष्ठ कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रा.सुभाष गोवेकर व प्रा.आनंद वैद्य यांचा समावेश होता. यावेळी प्रा.गोवेकर यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांच्या हस्ते तर प्रा.आनंद वैद्य यांचा सन्मान मधुभाईंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, केंद्रीय सचिव माधव अंकलगे, प्रा. एल बी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून दोघांचेही अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा