You are currently viewing जिल्ह्यात मनाई आदेश लागू

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सिंधुदुर्ग

 जिल्ह्यात विविध आंदोलनेसणउत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ)३७ (३) नुसार दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी खालील कृत्य करण्यांस मनाई आदेश जारी केला आहे.

शस्त्रेसोटेतलवारीभालेदंडेबंदुकासुरेकाठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरीक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणेस्फोटक पदार्थ घेवून फिरणेदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगणेव्यक्तीची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणेगाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणेसभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे,पाच पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणेजमाव करणे मिरवणुका काढणे व सभा घेणे.

आदेश शासकीय कर्तव्ये व अधिकार बजावणाऱ्या अधिकारीकर्मचारी व सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहेअशा व्यक्तींना आणि लग्नधार्मिक समारंभप्रेतयात्रा यांस लागू राहणार नाही.

या कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यांस परवानगी देण्यांचे अधिकार पोलीस अधीक्षकसिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांस राहतील.

या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र असणार आहेत. हा आदेश दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत लागू करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा