You are currently viewing ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव.. 

४ फेब्रुवारी २०२३ रोजी आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव.. 

मालवण / मसुरे :

 

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा २०२३ चा वार्षिकोत्सव शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. आज सोमवारी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीय यांनी दिली.

दरवर्षी धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाची तारीख निश्चित होते. त्यानुसार तारीख निश्चित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा