You are currently viewing गाव विकास प्रक्रीयेत लोकांना सामावून घ्यावे : सभापती अनुश्री कांबळी

गाव विकास प्रक्रीयेत लोकांना सामावून घ्यावे : सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्लेत सरपंच- सदस्यांसाठी दोन दिवशीय कार्यशाळा

वेंगुर्ले
स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण चव्हाण, वेतोरे सरपंच राधिका गावडे यांनी गाव विकास प्रक्रीयेत लोकांना सामावून घेतल्याने यश प्राप्त झाले. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनीहि गाव विकास प्रक्रीयेत लोकांना सामावून घेवून गावाचा विकास करावा असे प्रतिपादन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यानी केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्रमातंर्गत येथील सरपंच, सदस्यासाठी येथील साई मंगल कार्यालय येथे दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज सभापती अनुश्री कांबळी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपिठावर गट विकास अधिकारी उमा पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी एस. बी. गोसावी, एस. टी. परब, प्रशिक्षक दादा साईल, संतोष पाटील, कृषि विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्राम पंचायतीचे सरपंच तुळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण चव्हाण, वेतोरे सरपंच राधिका गावडे याचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर यानी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामूळे व गावातील लोकांच्या सहकार्यामूळेच आपण हे यश मिळवू शकल्याचे यावेळी तtळशीदास ठाकूर यानी सांगितले. यावेळी गट विकास अधिकारी उमा पाटील यानीहि उपस्थित सरपंच, सदस्य याना मार्गदर्शन केले. आरोग्य विस्तार अधिकारी एस. बी. गोसावी, व एस. टी. परब यानी यावेळी उपस्थित सदस्याना कोविड संदर्भात मार्गदर्शन केले.
स्वागत गट विकास अधिकारी उमा पाटील यानी तर प्रास्ताविक व आभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर यानी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + thirteen =