You are currently viewing ‘जिओ’ खोदाईचे काम चुकीच्या पद्धतीने….

‘जिओ’ खोदाईचे काम चुकीच्या पद्धतीने….

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

सावंतवाडी

शहरात जीओ कंपनीकडून सुरू असलेली खोदाई काम हे मनमानी कारभाराने आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असून, या कामाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना तसेच स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी संचीता महापात्रा यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी परवानगी नसताना रस्ता दोन्ही बाजूला खोदण्यात आला असून, एका ठिकाणी मधूनच रस्ता खोदल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी दिवाळी सारख्या सणाच्या काळात देखील सावंतवाडीतील जनतेने सहकार्य केले आहे. परंतु, जिओ कंपनीच्या सुरू असलेल्या मनमानी कारभार विरोधात सावंतवाडीकर आक्रमक झाले. यावेळी खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यावर सर्वात प्रथम डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडीतील जनतेला विश्वासात न घेता टॉवर चुकीच्या जागी उभारण्यात येत असल्याचे मत यावेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी यापुढे सावंतवाडीत खोदाई करू देणार नाही, जीओ च्या ठेकेदाराने ड्रिलिंग करूनच काम करा. असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी मुख्याधिकारी सांचीता महापात्रा यांच्याशी संपर्क साधला असता, सबंधित ठेकेदाराला बोलवण्यात आले असून, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − seventeen =