You are currently viewing कसबा मसुरे गाव रहाटीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

कसबा मसुरे गाव रहाटीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

मसुरे :

कसबा मसुरे गाव रहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम 23 सप्टेंबर पासून सुरू होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मसुरे देवस्थानचे प्रमुख श्री बाबुराव प्रभू गावकर आणि श्री संग्राम प्रभू गावकर यांनी केले आहे.
शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता गाव राहाटीची आठचीअवसरी घडी स्थळ बाळासाहेब प्रभुगावकर यांचे घरी,
सायंकाळी सात वाजता मसुरे मर्डे येथे उभादेव ढाळप.
सोमवार 26 सप्टेंबर सकाळी दहा वाजता श्री देवी माऊली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे घटस्थापना.
मंगळवार 4 ऑक्टोंबर सायंकाळी साडेचार वाजता आठाची अवसरी घडी स्थळ रवळनाथ मंदिर मसुरे गावठाण वाडी. सायंकाळी सात वाजता मसुरे मेढा पवणाई मंदिर येथे सर्व देवता तरंगाना निरी लावणे विधी.
बुधवार पाच ऑक्टोंबर सायंकाळी तीन वाजता श्रीदेवी पावणाई मंदिर मसुरे मेढा येथे विजयादशमी दसरा उत्सव, गुरुवार 6 ऑक्टोंबर श्रीदेवी माऊली मंदिर मसुरे देउळवाडा येथे सायंकाळी तीन वाजता एकादशी दसरा उत्सव.
शुक्रवार सात ऑक्टोंबर 2022 सकाळी नऊ वाजता श्री सिद्धनाथ मंदिर किल्ले भरतगड येथील दसरा उत्सव,
सायंकाळी तीन वाजता श्री देवी पावणाई मंदिर मसुरे मेढा वाडी येथे आठाची अवसरी घडी, रविवार दिनांक 9 ऑक्टोंबर नवानभक्षण दिन साजरा होणार आहे.तरी गाव रहाटीशी संबंधित सर्व मानकरी, स्थळकरी, मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ यांनी मसुरे गावराटीच्या नियमानुसार लागणाऱ्या सामग्रीसह वेळीच उपस्थित राहावे आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 11 =