You are currently viewing लोककलाकारांच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी आज आंदोलन

लोककलाकारांच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी आज आंदोलन

प्रकाश पारकर यांच उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली

कोविड-19 प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर` कोकणातील लोककलाकारांच्या व्यथा,शासनस्तरावरून करण्यात आलेला अक्षम्य दुर्लक्ष आणि सामान्य लोककलाकारांची मदतीवीना होणारी परवड याला वाचा फोडण्यासाठी आज गुरूवार दि. २९/०७/२०२१रोजी स.१०:३०वा.  प्रकाश पारकर, उपसभापती, पं.स.कणकवली तथा कोकण संघटक, आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील सर्व लोककलाकार _(भजनी कलाकार, मृदुंगमणी,दशावतारी, शक्ती तुरा,नमन,कीर्तनकार,गोंधळी, गझलकार)_ यांच्या वतीने प्रांताधिकारी, कणकवली यांना निवेदनातून आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे.
तरी शासनाकर्त्यांना जाग आणण्यासाठी व कलाकारांची उपासमार रोखण्यासाठी सर्व लोककलाकार प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
_(पंचायत समिती ,कणकवली येथे जमावे.)_

प्रतिक्रिया व्यक्त करा