You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत स्वच्छता मोहीम

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत स्वच्छता मोहीम

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी

  आंबोली वनक्षेत्र मार्फत आंबोली मुख्य धबधबा आंबोली पूर्वीचा वस या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

             या स्वच्छता मोहिमेंचे आयोजन आंबोली वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विद्या  घोडके यांनी केले होते. स्वच्छता मोहिमेमध्ये आंबोली सरपंच पालेकर, पार्पोली सरपंच, पार्पोली ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आंबोली मुख्य धबधबा व पूर्वीचा वस मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यात विशेषत: पिशव्या प्लास्टिक गोळा करण्यात आले, हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनशैलीमध्ये वेगवेगळे 75 पर्यावरण पूरक गुण अंगीकृत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये जवळच्या अंतरासाठी सायकल वापरणे, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, विजेचा वापर कमी करणे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आंबोलीतील स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व मोहीम यशस्वीरित्या पार करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 5 =