You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत सुयश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत सुयश

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत सुयश :*

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ४थी मधील कु.आद्या कुंभार हिने प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता ८ वी मधील कु. हीना सारंग हिने द्वितीय श्रेणी मिळवत उत्कृष्ट कामगिरी दर्शविली.
या विद्यार्थिनींना प्रशालेच्या कथ्थक शिक्षिका व संचालिका सौ. काश्मिरा पाटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा