You are currently viewing दृष्टांत

दृष्टांत

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दृष्टांत*

〰️〰️〰️

तूच एक हृदयस्थ कल्पतरू

सोज्वळ गाभारा मनांतरीचा

 

निर्मली पुण्यशील भास सारा

ब्रह्मस्वरूपातल्या प्रांजळाचा

 

शब्दाशब्दांचे स्पर्श भावगंधले

नाद अनाहत भक्ति भावनांचा

 

प्रभा तुझी कृपावंती कृपाळु

लोचनी दृष्टांत मोक्षमुक्तीचा

 

याहुनी दुजी सुखदा कोणती

जी सांगते सत्यार्थ जीवनाचा

 

तू , तूच एक अनामिक शाश्वत

त्रिखंडातला ध्यास जगण्याचा

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 

*©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞( 9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा