You are currently viewing २० ऑगस्ट २०२३ रोजी वेंगुर्लेत “शिवराज्याभिषेक ३५० – स्वराज्य आणि राष्ट्रनिर्माण” या विषयावर व्याख्यान

२० ऑगस्ट २०२३ रोजी वेंगुर्लेत “शिवराज्याभिषेक ३५० – स्वराज्य आणि राष्ट्रनिर्माण” या विषयावर व्याख्यान

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले येथे “शिवराज्याभिषेक दिन ३५० वर्ष” या औचीत्याने रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता  तालुक्यातील सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने “शिवराज्याभिषेक ३५० – स्वराज्य आणि राष्ट्रनिर्माण” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

श्री देव रामेश्वर मंदिर नजीक नगर वाचनालय, वेंगुर्ला शहर येथे श्री. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे हे व्याख्यान होणार आहे. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे शिवराज्याभिषेक दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६, विक्रम संवत्सरे १७२९ या शुभदिनी इसवी सन १६७४ साली किल्ले रायगडावर अत्यंत दिमाखात संपन्न झाला. काही शतकांनंतर हिंदूंना स्वतःचा सार्वभौम राजा मिळाला. हे वर्ष २ जून २०२३ ते २० जून २०२४ शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याचे महत्व, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला सह परिवार उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू धर्माभिमानी शिवप्रेमी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा