You are currently viewing अहंकार

अहंकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अहंकार*

********

 

कौसल्या मातेने पुशियले

तूं मारलास ना दशानन

श्रीराम वदले माते

मी नाही मारला रावण ॥१॥

 

तो महाप्रतापी, महाबलशाली

होता प्रकांड पंडित, महाज्ञानी

तो तर होता महाशिवभक्त

चारी वेद जाणणारा ज्ञानी ॥२॥

 

शिवतांडव रचियेता तो

मी न मारले लंकेशाला

त्याच्या अंतर्मनात स्थित

‘मी ‘ने मारले त्याला ॥३॥

 

विद्या रानडे

२२|३|२६

प्रतिक्रिया व्यक्त करा