You are currently viewing कोष्टीवाडी मित्रमंडळाचा संविता आश्रमात मदतीचा उपक्रम

कोष्टीवाडी मित्रमंडळाचा संविता आश्रमात मदतीचा उपक्रम

कोष्टीवाडी मित्रमंडळाचा संविता आश्रमात मदतीचा उपक्रम

कणकवली

“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या विचाराला साकार देत कोष्टीवाडी मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत रविवारी पणदूर येथील संविता आश्रमाला भेट देऊन विविध जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.

जीवन आनंद संस्था, मुंबई संचलित या आश्रमात मंडळाच्या वतीने कृतज्ञतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप परब उपस्थित होते.

या उपक्रमात कोष्टीवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर, उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, खजिनदार दर्शन पोयेकर, सहसचिव तेजस पोयेकर, ज्येष्ठ सदस्य शरद पोयेकर, श्रीकांत सावंत तसेच कार्यकर्ते शरद लाड, सुभाष सावंत, स्वप्निल सावंत, अक्षय पोयेकर, नरेंद्र कांबळी, नागेश राणे, रविराज कांबळी, शैलेश राणे आदींचा सहभाग होता.

या वेळी धनंजय सावंत यांनी मनोगत व्यक्त करत जीवन आनंद संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना मंडळामार्फत सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. संदीप परब यांनीही मंडळाचे अभिनंदन करत आभार मानले. मंडळाचा हा उपक्रम समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करणारा असून निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा