You are currently viewing 9 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतील

9 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतील

 

कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडचा संघ भारतात पोहोचतो ना पोहोचतो तोच इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताला डिवचलं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बहारदार प्रदर्शन करण्यास टीम इंग्लंड सज्ज असून इंग्लंड भारतीय भूमीवरचा 9 वर्षांपूर्वी तो विक्रम पुन्हा करेल, असा विश्वास फ्लॉवर यांनी व्यक्त केलाय.

भारतीय भूमीवर भारतालाच इंग्लंडने 2012 साली पराभवाची धूळ चाखायला लावली होती. इंग्लंडच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठीमागे पूर्व प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याच विजयाची पुनरावृत्ती इंग्लंडचा संघ करु शकतो. कारण यावेळीही टीममध्ये अव्वल खेळांडूंचा भरणा आहे, असं मत फ्लॉवर यांनी मांडलं आहे.

चेन्नई येथे येत्या 5 फेब्रुवारीपासून  सुरू होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोणत्या संघाला विजयाचा दावेदार मानतात, असे फ्लॉवर्स यांना विचारले असता. त्यांनी कोणत्याही एका संघाचे नाव घेतले नाही. ते म्हणाला, “कोणता संघ वरचढ ठरेल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित ते घाईचं ठरेल परंतु इंग्लंड संघात मजबूत खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे जो चांगला खेळ करण्यास उत्सुक आहे.”

टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

*कसोटी मालिकेचं वेळापत्रक*

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी

दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी

तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी

चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =