उभादांडा जि.प. काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल यांची नियुक्ती…

उभादांडा जि.प. काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल यांची नियुक्ती…

वेंगुर्ला

उभादांडा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती नंतर बोलताना किरण तांडेल यांनी सांगितले की उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस एक नंबरला आणण्यासाठी सर्व जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व सर्वांना सोबत घेऊन काम करणार. येणा-या काळात उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्ष हा आपल्याला एक नंबरचा पक्ष दिसेल. यावेळी किरण तांडेल यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक व गटनेते प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्यक्षा तथा नगरसेविका कृतिका कुबल, गोविंद पेडणेकर, महेश फोडनाईक, सागर नाईक, सुशिल बेहरे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा