You are currently viewing वेंगुर्ला येथे नवीन शिवसेना शाखांचे उदघाटन

वेंगुर्ला येथे नवीन शिवसेना शाखांचे उदघाटन

शिवसेना माजी नगरसेवक विलास परब यांच्या हस्ते झाले उदघाटन.

विधानसभा सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील आज दोन नवीन शाखांचे उदघाटन करण्यात आले.  पहिली सेन्टलुक्स हॉस्पिटल नाका येथे तर दुसरी राऊळवाडा येथे नवीन शाखांचे उदघाटन करण्यात आले.  यात शिवसेना माजी नगरसेवक विलास परब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी विधासभा सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना ता. प्रमुख यशवंत (बाळू) परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहरसमन्वयक विवेक आरोलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, जि. पदाधिकारी सचिन वालावलकर, नगरसेवक संदेश निकम, महिला ता. संघटक सुकन्या नरसुले, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, महिला शहरसंघटक मंजुषा आरोलकर शाखा प्रमुख गौतम मुळे, गजानन गोलतकर,डेलीन डिसोझा वैभव फटजी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + thirteen =