You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी) सिंधुदुर्गची २४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी) सिंधुदुर्गची २४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी) सिंधुदुर्गची २४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे उपस्थितीचे आवाहन

सिंधुदुर्ग :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एस.पी) सिंधुदुर्ग यांच्या वतीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस येथील शरद कृषी भवन येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी (एस.पी) काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा निरीक्षक मा. राज राजापूरकर साहेब उपस्थित राहणार असून, पक्ष बांधणी, संघटनात्मक अडचणी तसेच कार्यकर्त्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक संघटनांचे सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या व शंका मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमित सामंत यांनी ही माहिती देत, पक्ष बळकटीसाठी सर्वांच्या उपस्थितीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा