गुढी पाडव्याचे औचित्य साधून साई गाथा ग्रंथ मंदिराला भेट
माधव सेंटरचे मालक अजित नाडकर्णी यांचा पुढाकार
फोंडाघाट
गुढी पाडवा आणि “लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी” या भावनेचे औचित्य साधत माधव सेंटरचे मालक अजित नाडकर्णी यांनी हवेली नगर येथील श्री साई मंदिर हवेली नगर या मंदिराला “साई गाथा” हा महत्त्वपूर्ण ग्रंथ भेट दिला.
हा ग्रंथ श्री साई संस्थान शिर्डी येथून प्राप्त झाला असून, त्यामध्ये साई बाबा यांच्या जीवनचरित्रासह त्यांच्या चमत्कारांची, तसेच भक्तांच्या अनुभवांची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. साई भक्तांना या सर्व माहितीचा लाभ व्हावा, यासाठी हा ग्रंथ मंदिराला विनामूल्य देण्यात आला.
मंदिराचे विनोद मर्ये यांच्याकडे हा ग्रंथ सुपूर्द करण्यात आला. यावेळी भविष्यातही अशा प्रकारचे धार्मिक व प्रेरणादायी ग्रंथ मंदिरांना भेट देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, श्री साई मंदिरात दररोज सकाळी नियमित पूजा व आरती केली जाते. या सातत्यपूर्ण धार्मिक उपक्रमांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
