*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
1969 सालचे बॅच चे आज *”संम्मेलन आहे”*. त्यानिमित्ताने गीत.
स्नेह संम्मेलन आज केले आयोजित
पूर्व स्मृतींना मिळे उजाळा तंनिमित्तIIधृII
बालपणीच्या होत स्मृती कडू-गोड
रुसवे फुगवे तेव्हा घडत नकळत
पुन्हा दोस्ती मस्ती सारे होई पूर्ववतII1II
ऊन पाऊस लपंडाव पुढे जातो काळ
संसार रथ चक्रात रमावे मस्त
व्यथा संपे वाटते हलके मैत्रीनंII2II
*”अभिनव शाळे”* चे आहोत कृतज्ञ
चाळीस मित्र-मैत्रिणी होत एकसंघ
लाभले आदर्श शिक्षक आम्ही भाग्यवंतII3II
क्रीडा काव्य संगीत गायन प्रवीण
प्रत्येक जण रुळले बहरले त्याक्षेत्रांत
संसारी रमले जगती आनंदी जीवनII4II
पालक गुरूंचे लाभले सदा आशीर्वाद
मागे वळून पहाता वाटते कृतकृत्य
कृतज्ञता सर्वांप्रती ठेऊ मैत्री जागृतII5II
©️कवी.श्री अरुण गांगल. कर्जत जिल्हा रायगड.
पिन.410201.Cell.9373811677.
