प्रगतीशील शेतकरी विजय गावडे यांचा तालुकास्तरीय ‘आदर्श व प्रगतीशील शेतकरी’ पुरस्काराने गौरव
सावंतवाडी
प्रगतीशील बागायतदार, पर्यटन उद्योजक, चौकुळचे माजी सरपंच तसेच कुभंवडे गावचे रहिवासी विजय गावडे यांना तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात ‘आदर्श व प्रगतीशील शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, बागायती शेतीतील उल्लेखनीय कार्य, तसेच पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देत केलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल परिसरातून विजय गावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
