पुणे:
कवयित्री पल्लवी उमरे यांच्या “आयुष्य एक करार” या काषाय प्रकाशन प्रकाशीत कवितासंग्रहाचे प्रकाशन दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ ला शनिवारपेठ पुणे येथे आदरणीय जेष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे, माननीय प्रिया माळी उपसंपादक साहित्य लीला पंढरी, जेष्ठ साहित्यिक अरूणजी पुराणिक, वनिता चौधरी संपादक साहित्य लीला पंढरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दैनिक साहित्य लीला पंढरीचा प्रथम वर्धापनदिन , निमंत्रितांचे कविसंमेलन व “बाप”, आणि “आयुष्य एक करार” या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात पार पडले. जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ कवी अरूणजी पुराणिक आणि कवी अरूणजी देशपांडे यांना देण्यात आला. तर साहित्य लीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कवयित्री पल्लवी उमरे नागपूर यांना आणि विद्या अटक पुणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक साहित्यिक व साहित्य रसिकांची उपस्थिती होती.
