You are currently viewing सावंतवाडी पालिकेकडून शहरात “स्वच्छता रॅली”…

सावंतवाडी पालिकेकडून शहरात “स्वच्छता रॅली”…

सावंतवाडी

येथील नगर पालिकेच्या माध्यमातून “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन “स्वच्छता रॅली” काढण्यात आली. दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी आरपीडी, एसपीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह, एनसीसीसी विभागाचे कॅडेट सहभागी झाले होते.

स्वच्छतेबाबत ही जनजागृती रॅली शहरात काढण्यात आली.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, वैभव नाटेकर, रसिका नाडकर्णी, आरपीडी उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक जगदीश धोंड, एसपीके कॉलेजचे प्राध्यापक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा