You are currently viewing सावंतवाडी न.प. तर्फे उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण

सावंतवाडी न.प. तर्फे उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण

भाजप नेते माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा

सावंतवाडी

सावंतवाडी न.प. तर्फे येथील उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण भाजप नेते माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमात हे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर,भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, नगरसेवक ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, राजू राऊळ, उपसभापती शीतल राऊळ, केतन आजगांवकर, बंटी पुरोहित, निशांत तोरस्कर, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, संजू विरनोडकर, विनोद राऊळ, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − eight =