You are currently viewing देवगड किल्ल्याच्या वैभवात पडणार उद्यानाची भर; पर्यटन विकासाला नवी झळाळी!
Oplus_16908288

देवगड किल्ल्याच्या वैभवात पडणार उद्यानाची भर; पर्यटन विकासाला नवी झळाळी!

ऐतिहासिक खंदकात साकारणार आकर्षक उद्यान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी मंजूर; स्थानिक रोजगार आणि पर्यटनपूरक व्यवसायांच्या संधी वाढणार

देवगड : ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारण्यात येणाऱ्या नयनरम्य उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा