You are currently viewing जि. प. माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांना मातृशोक
Oplus_16908288

जि. प. माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांना मातृशोक

बांदा :

इन्सुली कोंडवाडा येथील सौ. जयश्री दत्ताराम गावडे (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने सावंतवाडी येथील रुग्णालयात मंगळवारी सकाळी निधन झाले.

त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या मातोश्री होत. तसेच विद्या विकास मंडळ इन्सुलीचे संचालक तथा माजी सैनिक किरण गावडे यांच्या त्या आई होत. सावंतवाडी येथील प्रतिथयश वकील नीता चंद्रकांत गावडे यांच्या त्या सासू होत.

त्यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता इन्सुली कोंडवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा