*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”ती” ची कहाणी*
ती ” ची कहाणी
“ती ” चं जगणं
अनेक प्रश्न घेऊन आयुष्याशी लढणं !
वर्तमानाची चिंता
भविष्याचे प्रश्न घेऊन
रोजचा दिवस ढकलणं !
“ती” च नाही महत्त्व
घराला नी समाजाला
तिच्या वेदना जाणून घ्याव्याशा
वाटत नाही कुणाला?
जीवनाच्या वाटचालीत धीर देत
मार्गक्रमणा करित असते
अनपेक्षित घडले की
असहाय्य बनते?
जीवनाच्या भयानक भोवर्यात
अजाणता सापडते. .!
जीवनाच्या वळणावर मात्र
“आयुष्य ” मोठं प्रश्नचिन्ह बनतं?
समस्येची उकल ही
करावीच लागणार!
आनंददायी तेजोमय यश कि गडद काळोखी अपयश. .!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
