You are currently viewing डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर कादंबरी 

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर कादंबरी 

 

अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन चरित्रावर लवकरच कादंबरी साकारणार आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक व ज्यांनी किमान 200 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत असे वर्ध्याचे सुप्रसिद्ध लेखक प्रा. नवनीत देशमुख यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. प्रा नवनीत देशमुख हे सुप्रसिद्ध कादंबरीकार असून नुकतीच त्यांनी अमरावतीच्या माजी पालकमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या जीवनावर वसुधा नावाची कादंबरी लिहिली आहे .या कादंबरीचे प्रकाशन सुप्रसिद्ध व भव्य असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे नुकतेच संपन्न झाले आहे.

 

त्यांचे वाड़्मय कौशल्य लक्षात घेऊन डॉ

पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डा

नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख व माजी कुलगुरू तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष श्री दादासाहेब काळमेघ यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याची विनंती केली. त्यांनी ह्या दोन्ही विनंत्या मान्य केल्या असून सुरुवातीला ते डॉ पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन चरित्र तसेच त्यांचे पापळ गाव व इतर परिसराचा अभ्यास करून या कादंबरीला मूर्त रूप देणार आहेत. श्री दादासाहेब काळमेघ यांना जाऊन फार वर्ष झालेली नाहीत .त्यामुळे दादा साहेब काळमेघ यांच्या समकालीन लोक अजूनही मुलाखतीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय त्यांचे सुपुत्र श्री हेमंत काळमेघ हे सध्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी श्री हेमंत काळमेघ यांना या कादंबरीची माहिती दिली असून या प्रगतीची माहिती त्यांना उपलब्ध करून दिली आहे.

 

डॉ

पंजाबराव भाऊसाहेब देशमुख त्यांच्या जन्मशताब्दीमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने युग निर्माता नाटक जनतेसमोर सादर केले होते. तेव्हापासून त्यांच्या जीवनावर कादंबरी असावी असे वाटत होते. यापूर्वी प्रा.सौ कल्पना देशमुख यांनी डॉ.पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर भाऊ नावाची कादंबरी लिहिली असून ती प्रसिद्ध झाली आहे.

या कादंबरीला प्रकाशित करण्याची सर्व जबाबदारी डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने स्वीकारली असून आज कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त या कार्याला रितहर सुरुवात झाली आहे. डॉ

भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर नवनीत देशमुख सारखे सिद्धहस्त लेखक कादंबरी लिहिणार ही बातमी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना सुखद धक्का देणारी आहे. प्रा. नवनीत देशमुख यांनी हा संकल्प जाहीर केल्याबद्दल त्यांचा प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी शाल व पुस्तक देऊन गौरव केला आहे

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा