जागतिक महिला दिनी सावंतवाडीत नारीशक्तीचा जागर
नगरपरिषदेच्या वतीने महिला अधिकारी-कर्मचारी व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; विविध स्पर्धांनी रंगली कार्यक्रमाची मैफल
सावंतवाडी
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करत सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमात नारीशक्तीचा जागर करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ पालिकेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर शहरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांसाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचा करण्यात आलेला विशेष गौरव होय. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, महिला पत्रकार जुईली पांगम व अनुजा कुडतरकर यांच्यासह अनंत चिंचकर, कबीर हेरेकर, समृद्धी गावडे, जीया शेख, प्रज्ञा मोंडकर, तृप्ती राऊळ, नेहा बांदेकर, स्तुती गुरव, अनुराधा महाजन, हर्षा देऊलकर, गोकुळी बुवा, सुप्रिया गावडे, अनिशा राणे, सुमीधा नाईक, प्रतिभा चितारी, विजय सुकी, अकीलाबाणु पटेल, नुपूर मठकर, प्रज्ञा पांचाळ, निधी खडपकर, साक्षी रामदूरकर, सपना म्हापसेकर आणि वेणू सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या प्राची पाटील, प्राजक्ता कांबळे, आसावरी केळबाईकर, माधवी म्हापसेकर, परवीन शेख, नेहा आडेलकर, सोमिया चव्हाण, रेश्मा मेहतर, अनिता होडावडेकर, सपना जाधव, सुकन्या कुलकर्णी, शितल वाळके, लीना राणे, शमिका नेमळेकर, संजीवनी शिरसाट, गौरवी कुडाळकर, गौरी नाईक, रजनी शिंदे, प्रज्ञा काणेकर, भारती लाखे, गीता बरागडे, संगीता कदम, जया कदम, दशमी लाड, अनुष्का सनम, गौतमी तेंडोलकर, रिया झोरे, अंजली वेंगुर्लेकर, गीता जाधव, निता कुडतरकर, सुगंधा चोडणकर, मिनाक्षी पवार आणि लक्ष्मी कांबळे यांसह सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि मनोरंजनासाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वसंरक्षण मार्गदर्शनही करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी आणि पोलीस कॉन्स्टेबल सावी पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली भालेकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर आभार सुनिता पेडणेकर यांनी मानले.
