राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रणरागिणींचा सन्मान.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील व रूपा मुद्राळे या दोन रणरागिणी समाजामध्ये अतिशय तळमळीने सेवाभावी कार्य करतात. निराधार,दिव्यांग, निराधार रुग्ण तसेच संकटात असलेल्यांना सातत्याने मदत करत असतात तर रस्त्यावर होणाऱ्या अपघातामधील अपघातग्रस्तांना हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी मदत, निराधारांसाठी पेन्शन योजना व आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील मदत करतात.
याचीचं दखल घेऊन राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून या दोन रणरागिणींचा भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजा शिवाजी मित्रमंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी,डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, सौ फर्नांडिस,आशा परेरा,इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख,लक्ष्मण कदम,रवी जाधव व महिला आदी उपस्थित होत्या.
