You are currently viewing कणकवलीत नगरपंचायतने बॅनर हटविले

कणकवलीत नगरपंचायतने बॅनर हटविले

पथकाची कारवाई: या पुढेही कारवाई सुरूच राहणार

कणकवली :

कणकवली शहरातील जागोजागी लावलेले बॅनर आज बुधवारी सकाळ पासून हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी प्रामुख्याने महामार्गलगत हे बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. राजकीय पक्षांच्या बॅनरचा यात जास्त प्रमाणात समावेश होता. सकाळी गांगो मंदिर ते नरडवे नाक्या​पर्यंतचे सर्वच बॅनर हटविल्याने शहराने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र होते. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या सुचनेनुसार ही कारवाई कर​ण्यात आली. या कारवाईत कर्मचारी प्रवीण गायकवाड, विशाल होडावडेकर आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा