You are currently viewing डेरवण युथ गेम्स 2026 बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व!
Oplus_16908288

डेरवण युथ गेम्स 2026 बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व!

सावंतवाडी :

डेरवण, चिपळूण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने आयोजित केलेल्या सोळा वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील एकशे सहा विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. गेली बारा वर्षे एस.व्ही.जे.सी.ट्रस्टतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी मागील नऊ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळवत आहेत. ॲकेडमीच्या हर्ष राऊळ, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुष्कर केळूसकर या आंतरराष्ट्रीय रेटेड विदयार्थ्यांसोबत सात वर्षीय आकाश वाटवे, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो, दर्श सावंत या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

सात राऊंड्सच्या या स्पर्धेत मुख्य गटात पार्थ गावकर याने पाच गुण मिळवून नववा क्रमांक, हर्ष राऊळ याने पाच गुण मिळवून बारावा क्रमांक, पुष्कर केळूसकर याने पाच गुण मिळवून तेरावा क्रमांक, लिएण्डर पिंटो याने पाच गुण मिळवून पंधरावा क्रमांक आणि सोळाशे रेटिंगच्या गटात चिदानंद रेडकर याने पाच गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, बुद्धिबळ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर आणि जिल्ह्यातील टाॅप रेटेड आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व स्तरातुन यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा