*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जय हो भारत*
🚩🚩🚩🚩
थरथरले ना हात मावळे
शरण कधी ना गेले
मनगटातले बळ घेऊनी
दोन्ही बाहु लढले लढले.
आले वीर मरण तरीही
ना झुकले ना हरला माथा
त्याच वीरांच्या मायभूवरी
लिहिल्या पवित्र गाथा.
लढल्या खिंडी लढले किल्ले
प्राणपणाने इथे झगडले
अमरवीरांच्या रक्ताने ते
पावन झाले पावन झाले.
भूमी रणवीराचीं कवणे लिहितो
गाऊ भारतभुचे गाण
जय जय भारत जय हो भारत
गाऊ रे गुणगान..
गाऊ रे गुणगान……
भूमिपुत्र वाघ
उमरगा धाराशिव महाराष्ट्र.
9172972482
