You are currently viewing महापुरुष मित्र मंडळ कणकवलीतर्फे सुरेश सावंत यांचा सत्कार

महापुरुष मित्र मंडळ कणकवलीतर्फे सुरेश सावंत यांचा सत्कार

महापुरुष मित्र मंडळ कणकवलीतर्फे सुरेश सावंत यांचा सत्कार

माजी सभापती म्हणून कार्याचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

कणकवली :

महापुरुष मित्र मंडळ, कणकवली यांच्या वतीने कणकवलीचे माजी सभापती सुरेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. समाजकारण व सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुरेश सावंत यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक व विकासात्मक कामांमधील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा